ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
हाती धरून झाडू, तू मार्ग झाडलासी
स्पर्शे तुझ्या महात्म्या, ये थोरवी श्रमासी
तण उच्चनीचतेचे, निपटून काढिले तू
तट धर्मकल्पनांचे, उलथून पाडिले तू
दलितांस धीर दिधला, पुशिलेस आसवांसी
माणूस तोच आहे, नांदोत धर्म लाख
मानव्य हीच आहे, समतेस आणभाक
सेवेस
लाविले तू, धनवंतही विलासी
साधारणांत रमसी, असुनी महामती तू
अवरूद्ध धर्मचक्रा, दिधली पुन: गती तू
धागा परंपरांचा, तरीही न तोडलासी