ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
असा नेसून शालू हिरवा आणि वेणीत खूपसुन मरवा
जाशी कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे-पुढे ?
का रे वाटेत गाठून पुसशी, का रे निलाजर्या तू हसशी
जाते सख्याकडे, प्रियाकडे, तुला सांगते-
त्याची माझी रे प्रीत जडे
तुजपरी
गोरी गोरी, चाफ्यावानी सुकुमारी
दुपारचा पार ऊन जळते ग वर ऊन जळते
टकमक बघू नको, जाऊ नको तिच्या वाटे
का रे उठठेव, तिला कळते रे तिची तिला कळते
का ग आला असा फणकारा, कंकणाच्या करीत झणकारा
जाते कुणीकडे, कुणाकडे, सखे सांग ना
का ग बघतेस मागे-पुढे ?
दूर डोंगरी घुमते बासरी, चैत्र बहरला वनामधी
पदर फडफडतो, ऊर धडधडतो, प्रीत उसळते मनोमनी
मी भल्या घरातील युवती, लोक फिरतात अवतीभवती
जाते सख्याकडे, प्रियाकडे, खरं सांगते-
म्हणून बघते मी मागे-पुढे