गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
आज या एकांत काली मीलनाची पर्वणी
Aaj Ya Ekant Kali Milanachi
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
आज या एकांत काली मीलनाची पर्वणी
दूर का तू साजणी, दूर का तू साजणी ?
सोड खोटा राग रुसवा, हा बहाणा काय फसवा
लाजरी मूर्ती तुझी ही अधिक वाटे देखणी
देखणी हे साजणी..
दो जिवांच्या संगतीने फुलून येती फूल-पाने
दिवस
होई रात्र येथे, रात्र वाटे चांदणी
चांदणी हे साजणी..
हे गुलाबी धुंद कोडे, बोल थोडे, हास थोडे
स्वप्नवेड्या प्रियकराची ऐक वेडी मागणी
मागणी हे साजणी..
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.