गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
आभाळ फाटलेले
Abhal Phatalele
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
आभाळ फाटलेले, टाका कुठे भरू मी ?
आता कसे करु मी ?
स्वप्नी चितारलेल्या झाल्या विराण जागा
वाहून पार गेल्या वाळूवरील रेघा
पाण्यात त्या मिळाल्या, त्यांना कशी धरू मी ?
जो मित्र पाठिराखा, तो होय पाठमोरा
सार्या मनोरथांचा तो ढासळी
मनोरा
आयुष्य कोसळे हे, त्या काय सावरू मी ?
प्रीतीविना जिवाची पंखाविना भरारी
आधार ना निवारा आता दिशात चारी
ना अर्थ या जिण्याला, का व्यर्थ वावरु मी
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.