अस्त पातलासे चंद्रा, तारका विझाल्या
फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या
जाग पाखरांना आली, जाग ये सुगंधा
पात्र पाणियाचे हाती उभी असे भीमा
दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव, नामा
भक्तराज चोखामेळा दुरून देई सादा
देह-भाव मिळुनी केला काकडा मनाचा
निघून धूर गेला अवघ्या आस-वासनांचा
ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.