गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • एक धागा सुखाचा
 • Ek Dhaga Sukhacha
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
  जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे

  पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा
  कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे

  मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची
  जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे !  या वस्‍त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन
  कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे !


गदिमा गौरव | Special Quotes
 • पं.महादेवशास्त्री जोशी
  गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems