गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
एकटी शिवारी गडे
Ekati Shivari Gade
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
एकटी शिवारी गडे चालविते मी विळा
का उगाच येते बाई गाणे माझ्या गळा
दाटली ग सांज बाई दिवस बुडाया आला
अंतरी कशाचा उजेड माझ्या झाला
का असा अचानक हा डोले ग जोंधळा
तुज रात्रंदिवस ओढ ज्याची भारी
धुंडीत तुला ती
मळ्यात फिरे स्वारी
तो वसंत वेडा ग त्याची तू कोकिळा
लपंडाव का असा, तोंड तरी पाहू दे
ना अशीच मनीची प्रीत तुझ्या गाऊ दे
होऊ दे गळ्यातील हा साद पुरा मोकळा
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.