गदिमा नवनित
  • प्रभो, मज एकच वर द्यावा
    या चरणांच्या ठायीं माझा निश्चल भाव रहावा
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • एकदा येऊन जा तू
  • Ekada Yeun Ja Tu
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    एकदा येऊन जा तू, एकदा भेटून जा
    मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगून जा

    मीलनाचे चित्र होते अंतरी मी रेखिले
    मी तुझ्यामाझ्यात होते विश्व सारे देखिले
    आज सीमा त्या जगाची तूच ओलांडून जा

    शेवटी संपून गेली स्वप्‍नसुंदर ती कथा
    मी तरी कुरवाळतो, जपतो उरी वेडी व्यथा
    आठवावे मीच ते, विसरू कसा सांगून जा


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems