गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
ऐकशील का रे माझे
Aaikashil Kare Maze
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत ?
दूर दूर जाते धरुनि उरी तुझी प्रीत !
वाट तुझी बघता का रे पाय थकुन गेले
निमंत्रणावाचुनि जवळी मरण मात्र आले
फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत !
भाग्य हेच अजुनि येतो गंध पाकळीस
स्पर्ष तुझा झाला होता चुकुन या कळीस
उमलताच सुकले तरिही आयु हे पुनीत !
सूर आर्त गीताचा या तुझ्या कधी यावा
अश्रुबिंदु एकच नयनी तुझ्या ओघळावा
हेतु एक शेवटचा या थरथरे मनात !
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.