गदिमा नवनित
 • चंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड
  मला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • ओळखिले मी तुला नाथा
 • Olakhile Me Tula Natha
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  ओळखिले मी तुला नाथा, ओळखिले मी तुला
  कुरूप सांवळ्या मूर्तिमधला देवपणा जाणिला

  सौधावरती पडे चांदणे
  अर्ध्या मिटल्या माझ्या नयने
  टिपले कण ते अधिरपणाने
  सतार अंकी घेउनिया तू अनुरागची छेडिला !

  कला करी तव, उदारता मनि
  भीती बसली अंति पूजनी
  तव सहवासी मधु दिनरजनी
  काल सुगंधित, देह सुगंधित, सुगंध उरी दाटला !

  तुझ्यासारखा नाथ असावा
  तुझ्या छातीवर घेत विसावा
  उरलासुरला राग हसावा
  ठसा मूर्तिचा तुझ्या सानसा पोटी मी गोपिला !


गदिमा गौरव | Special Quotes
 • पु.भा.भावे
  'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems