गदिमा नवनित
  • कालपुरुषा तु स्वत: थकशील,थेरडा होशील पण,आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.
    आम्ही लढतच राहु.हे आव्हान घे माझे-एका कलाकाराचे!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • अंगणी गंगा घरात काशी
  • Angani Ganga Gharat Kashi
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    काय सांगू मी कोणापाशी
    अंगणी गंगा घरात काशी

    देवाहुनही उदार सुंदर
    सुवासिनीचा श्रीविश्वेश्वर
    जवळी माझ्या वसे दिन-निशी

    तपावाचुनी कृपा लाभली
    हिरवळ पायी, शिरी सावली
    सौख्य सजविते मनामनाशी

    स्वप्‍नाहून हे सत्य मनोहर
    अमृत सांडे तृप्त मनावर
    प्रमोद कवळी दाही दिशाशी


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems