गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
अंबिका माया जगदीश्वरी
Ambika Maya Jagadishwari
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
पाहुणी आली माझ्या घरी
अंबिका माया जगदीश्वरी
या डोळ्यांच्या दोन रांजणी
पस्ताव्याचे भरले पाणी
त्या पाण्याने न्हाऊ घालिते बसवुन पाटावरी
रक्तामधले इमान बळकट
त्याचा भाळी भरिते मळवट
भलेपणाची फुले ठेविते वाकुन पायावरी
चुका-चाकवत केली भाजी
भावभक्तिची भाकर ताजी
लेक दरिद्री तुझी विनविते आई भोजन करी
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.