गदिमा नवनित
  • का कालचा उद्याला देसी उगा हवाला
    द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला
    अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • कधी मी पाहीन ती पाऊले
  • Kadhi Mi Pahin Ti Paule
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    सामर्थ्याहून समर्थ निष्ठा, अशक्य तिजसी काय ?
    पडे अहल्या शिळा, त्यास्थळी येतील प्रभूचे पाय !
    कधी मी पाहीन ती पाऊले ?

    पाहिन केव्हा तो सोहळा
    प्रभू चरणांचा स्पर्ष कपाळा
    आनंदाश्रू झरतील डोळां
    भाग्यच माझे दिसेल मजसी मूर्त उभे ठाकले !

    रणांत जिंकुन कौरवसेना
    यश सिद्धीच्या करित गर्जना
    अभये अर्पीत साधुसज्जना
    पाच प्राणसे येतिल पांडव विजयाने न्हाले !

    मारून रावण कपटी कामी
    अशोकवनि या येतील स्वामी
    वाहणार हे पदीं प्राण मी
    भेटीसाठी अशा अलौकीक कालचक्र थांबले !

    देवाहूनहि समर्थ भक्‍ती
    स्वरात माझ्या अमोघ शक्‍ती
    सुफलित व्हाया माझी उक्‍ती
    पंचकन्यका अर्पण करिती पुण्य मला आपले


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems