गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
Kabirache Vinato Shele
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम !
एक एकतारी हाती भक्त गाई गीत
एकएक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनश्याम !
दास रामनामी रंगे राम होइ दास
एकएक धागा गुंते रूप ये पटास
राजा
घनश्याम !
विणुन सर्व झाला शेला पूर्ण होइ काम
ठायिठायि शेल्यावरती दिसे रामनाम
राजा घनश्याम !
हळुहळु उघडी डोळे पाहि जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ?
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.