गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • का मोगरा फुलेना
 • Ka Mogara Phulena
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  बरसात चांदण्याची, वारा कसा हलेना
  का मोगरा फुलेना ?

  डोळ्यांतल्या जळाने मी रूप थोर केले
  वाढीस लागला हा आले वसंत, गेले
  हिरवा दिसे पिसारा परि का कळी धरेना ?
  का मोगरा फुलेना ?

  माझ्या मनोव्यथांची हळुवार भावगीते
  भवती फिरून

  याच्या मी नित्य गात होते
  हिमशुभ्र हास्य तैसे याच्यावरी डुलेना
  का मोगरा फुलेना ?

  लागे ना थांग याचा अजुनी न मौन सोडी
  आधीच धुंद झाले मी मात्र गंधवेडी
  चुकते कुठे कुणाचे माझे मला कळेना
  का मोगरा फुलेना ?


गदिमा गौरव | Special Quotes
 • लेखक पु.भा.भावे:
  वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems