गदिमा नवनित
 • नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर,
  अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • काय सामना करू तुझ्याशी
 • Kai Samana Karu Tuzyashi
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  अग, काय सामना करू तुझ्याशी, नारीजात तू दुबळी ग
  हुकूम पाळिता पुरुषजातिचा सरे जिंदगी सगळी ग
  बाळपणी तुज धाक पित्याचा, तरुणपणी तुला हवा पती
  वृद्धपणा तव पुत्राहाती, स्वतंत्र बुद्धी तुला किती ?

  अरे नको वाढवण सांगू शाहिरा पुरूषजातीचे फुकाफुकी
  स्‍त्रीजातीच्या अकलेपुढती तुझी बढाई पडंल फिकी
  सावित्रीच्या चतुरपणाने यमधर्माला दिला धडा
  असेल ठावी कथा जरी ती, बोल मज पुढे घडाघडा !

  अग तूच सांग ग, कोणासाठी सावित्री ते दिव्य करी
  सावित्रीची कथा सांगते पुरूषप्रीतिची मातबरी !
  पतीवाचुनी कसे जगावे हाच तियेला प्रश्न पडे
  इथेच ठरला पुरूष श्रेष्ठ की, चतूर सारीके, बोल पुढे !

  पुरुषावाचून जन्मे नारी, या पृथ्वीचा कोण पती ?
  पित्यावाचुनी जन्मा आली, काय थांबली तिची गती ?

  अग अज्ञानाने नकोस बोलू आभाळाची सुता धरा
  गती कशाची, सूर्याभोवती फिरे नार ती गरागरा !
  पुरुषासाठी नार जन्मते, पुरुषासाठी जन्म तिचा
  वृक्षावाचुनी जन्म पांगळा फुलारणार्‍या वेलीचा !

  अरे सांग शाहीरा, नारीवाचुन पुरूषहि झाला कधी पुरा ?
  पुराणशास्‍त्रें धुंडून पाही, धुंड गगन की वसुंधरा
  तार्‍यामाजी शुक्र नांदतो, वार्‍यापाठी उभी हवा
  पृथ्वीभंवती चंद्र फिरतसे वेष घेऊनी नवा नवा

  चकला ना गे, चतुरपणा तव, माझ्या मार्गी तूच पुढे
  नारिनराच्या प्रेमावाचुन जगावरी काय घडे ?
  हवा कशाला कलह सांग हा, आपसांतला खुळ्यापरी
  हारजितीची हौसच खोटी, तुझी नि माझी बरोबरी


गदिमा गौरव | Special Quotes
 • पं.महादेवशास्त्री जोशी
  गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems