गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • काही तरी तू बोल
 • Kahi Tari Tu Bol
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  काही तरी तू बोल
  तुझे बोलणे झिरपत जाईल-
  मनात माझ्या खोल

  हसून बोल की वद रागेजून
  चिडून बोल की थोडी लाजून
  असेल तसला असो दागिना-
  सोन्यातच तर असते मोल

  फिरव अंगुली, छेड सतार
  असो शंकरा, असो बहार


  मधूरपणाची तहान आम्हां-
  राग रागिण्या सार्‍या फोल

  तुच धाडशी तुषार चार
  पाऊस पडू दे वारंवार
  रखरखलेल्या रानी राणी-
  पिकं होऊ दे किंवा ओल