गदिमा नवनित
 • नसे राऊळीवा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • किती दिसांनी आज भेटसी
 • Kiti Disanni Aaj Bhetashi
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  किती दिसांनी आज भेटसी, पुसशी कुशल मला
  तुझ्याचसाठी झुरते मनि मी, कशी सांगू रे तुला

  प्रीतीची वचने राजा, विसरू कशी?

  दिवस सहज निघुनी जातो, रात्री आठव येतो
  अश्रुंनी माझी भिजुनि जाई उशी

  मानभावी पुरुषी वाणी, फुलपाखरांची गाणी
  स्‍त्री-जाति वेडी भुलुनि पडते फशी

  एकवार मधुकर येतो, चैत्रमास चाखुन जातो
  स्वप्‍नाळू राही, फुलवेली वेडीपिशी


गदिमा गौरव | Special Quotes
 • पु.भा.भावे
  'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems