गदिमा नवनित
 • का कालचा उद्याला देसी उगा हवाला
  द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला
  अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • कुरवाळू का सखे मी
 • Kurawalu Ka Sakhe Mi
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचे
  झाले तुझी जिथे मी, भय कोणते, कशाचे ?

  का झाकितेस डोळे, का वेळतेस माना ?
  गुंफून पाच बोटे का रोखिसी करांना ?
  माझे मला न ठावे हे खेळ संभ्रमाचे

  वार्‍यावरुन येतो मधुगंध मोगर्‍याचा
  तो गंध आज झाला निःश्वास भावनांचा
  तुज शोभते शुभांगी चातुर्य संयमाचे

  एकांत शांत आहे दोन्ही मने मिळाली
  प्रीति मना-मनांची दोघांसही कळाली
  जागेपणी सुखावे हे स्वप्‍न प्रेमिकांचे


गदिमा गौरव | Special Quotes
 • लेखक पु.भा.भावे:
  वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems