गदिमा नवनित
  • "नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा
    काय धनाचें मूल्य मुनिजनां ? अवघ्या आशा श्रीरामार्पण"
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • केतकीच्या बनात
  • Ketakichya Banat
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    केतकीच्या बनात
    उतरत्या उन्हात
    सळसळ पानात-
    जपून जा !

    जपून जा गडे जपून जा-
    कुठे निघेल नाग !

    पायवाट लपेल
    काटाकुटा रुपेल
    तळव्यात खुपेल-
    जपून जा !

    ढग येता दाटून
    मग वाट कोठून
    पाय ठेवू रेटून-
    जपून जा !

    जपून जा गडे जपून जा-
    कुठे निघेल नाग !

    उसळत्या वयात
    बळ तुझ्या पायात
    चाल ठेव कह्यात
    जपून जा !

    फसू नको मोहात
    जरा उभी रहात
    मागेपुढे पहात
    जपून जा !

    जपून जा गडे जपून जा-
    कुठे निघेल नाग !

    वादळाच्या वार्‍यात
    नको चालू तोर्‍यात
    पडशील भवर्‍यांत
    जपून जा !

    जाऊ नको गुंगत
    स्वप्‍नात रंगत
    तुझी तुला संगत
    जपून जा !

    जपून जा गडे जपून जा-
    कुठे निघेल नाग !