गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
गगनी अर्धा चंद्र उगवला
Gagani Ardha Chandra Ugawala
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
गगनी अर्धा चंद्र उगवला, मोहरले चांदणे
अडली वाणी, मिटे पापणी, मिटले ग लोचने
राहिले अर्ध्यावर बोलणे !
प्रथम बोलले तेच काहीसे
मला न सुचले उत्तर कैसे
भलत्यावेळी कसे बाई ग आठवले लाजणे ?
धीर धरून मी पुसता काही
अस्फुट
त्याचे उत्तर येई
शब्दाहुनही अधिक बोलके झाले मग पाहणे !
एक हाक ये दुरुनी साधी
सिद्धीपुर्वी सुटे समाधी
पुन्हा न जमले कधी त्यापरी एकांती भेटणे !
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.