Bai Mi Giridhar War Warila
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
अर्ध्या रात्री यमुना पात्री कर त्याने धरिला
गिरीधर वर वरिला बाई मी गिरीधर वर वरिला
रंगरंग नीत मजसी खेळतो, रंगनाथ माझा
मी मेवाडी, राजदुलारी, मथुरेचा तो राजा
जगावेगळी माझी सत्ता, ध्यास न दुसरा उरला
गिरीधर वर वरिला
फेर धरून मी
नाच नाचले, न्याहळते शामा
मीच राधिका, मीच रुक्मिणी, मीच तयाची भामा
मुखी नाचते नाम तयाचे, ताल पैंजणी उरला
गिरीधर वर वरिला
कालिंदीच्या तटी कलयुगी रोज रंगते होरी
भिजे ओढणी, भिजे कंचुकी, भिजती अंगी सारी
आनंदाचा पडतो पाऊस मेघ सांवळा सरला
गिरीधर वर वरिला