गदिमा नवनित
  • दगडाच्या देवा दह्याच्या घागरी,अस्पृश्याच्या घरी पाणी नाही.
    पाळीव पोपट गोड फळे त्याला आणि गरिबांना कदांन्न का?
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • गंगा आली रे अंगणी
  • Ganga Aali Re Angani
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    गंगा आली रे अंगणी

    बारा महिने तेरा काळ
    रानोमाळी सुगी सुकाळ
    चतुरपणाने करा गड्यांनो,
    चतुरपणाने करा जळाच्या पाटाची आखणी

    भूमीवरच्या भागीरथीला
    स्वर्गंगेचा ओघ मिळाला
    ऐसे माहात्म्य गंगेचे
    पाणी, पाणी, जिकडे-तिकडे, सौख्याची श्रावणी

    सुंबरानं मांडिलं गा

    बिरूबा या देवाचं
    आबाळं या पित्याचं गा धरतरी मातंचं

    पिकून पिवळी झाली धाटं
    घुमवा भलरी भल्या पहाटं
    भलरी भलरी भलरी दादा भलगडी दादा
    करा कापणी, काढा दौलत, साधा हो पर्वणी

    यंत्र चालवा गाळा ऊस
    अमाप पिकला घ्या कापूस
    वेचा कापूस वेचा ग वेचा कापूस वेचा
    दूध विकाया पुन्हा निघाल्या गोकुळच्या गौळणी

    युग यंत्राचे आले रे, अवघड सोपे झाले रे
    घाम न आता पडो कुणाचा कोठे निष्कारणी

    दळिद्र गेले पळुनि पार
    फळाफुलांना आला बहार
    नांदायाते येई लक्ष्मी स्वर्गीची पाहुणी

    गंगा आली, लक्ष्मी आली अंगणी


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems