ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
चल ग सये वारुळाला, वारुळाला, वारुळाला ग
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ग
नागोबाचे अंथरूण निजले वरी नारायण
साती फडा ऊभारून धरती धरी सावरून
दूध-लाह्या वाहू त्याला, वाहू त्याला, नागोबाला
बारा घरच्या बाराजणी, बाराजणी, बाराजणी
रूपवंती कुंवारिणी, कुंवारिणी, कुंवारिणी
नागोबाची
पुजू फणी, कुंकवाचा मागू धनी
राजपद मागू त्याला, मागू त्याला, नागोबाला
बाळपण त्याला वाहू, त्याला वाहू, त्याला वाहू ग
नागिणीचा रंग घेऊ, रंग घेऊ, रंग घेऊ ग
नागोबाला फुलं वाहू, लालमणी माथी लेवू ग
औक्ष मागू कुंकवाला, कुंकवाला, बाई कुंकवाला