गदिमा नवनित
  • "नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा
    काय धनाचें मूल्य मुनिजनां ? अवघ्या आशा श्रीरामार्पण"
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • नखांनखांवर रंग भरा
  • Nakhanakhawar Ranga Bhara
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    चला सख्यांनो हलक्या हाते नखांनखांवर रंग भरा ग
    नखांनखांवर रंग भरा

    आज सावलीपरी जायचे त्यांच्यामागे पाऊल ग
    पायी पैंजण बांधा द्याया आगमनाची चाहुल ग
    सिंहकटीवर स्वैर खेळू द्या रत्‍नमेखला सैल जरा

    बाहुंवरती बांधा बाई बाहुभुषणे नागाची
    अंचलि झाका हृदयावरची कमळे ही अनुरागाची
    गळ्यात घाला हार साजिरा पदकी त्याच्या दिव्य हिरा

    वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा ग
    आकाशातिल नक्षत्रांसम माथी मोती जडवा ग
    सौभाग्याच्या नगरा नेते सौंदर्याचा थाट पुरा