गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • चाल बैला चाल
 • Chal Baila Chal
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  चाल बैला चाल
  गीत गाती रानपाखरं घुंगुर देती ताल

  पहाट फुटता औतं जुपली, सकाळ आली आणिक गेली
  बघताबघता दुपार निवली,
  गार वारा मावळतीचा सुखवी संध्याकाल

  घटका येती घटका जाती, तुलामला ते काय माहिती
  राबे त्याला लाभे शेती,
  घाम गाळुनी

  सुगी साधता सुरू आपले साल

  नंदी तू तर दूत शिवाचा, खांदा घेसी भार भवाचा
  वंश थोर रे जगात तुमचा
  गीता गाता कृष्ण स्वत:ला म्हणुन म्हणे गोपाल


गदिमा गौरव | Special Quotes
 • प्रा.रा.ग.जाधव
  माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems