गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी
  • Chandarani Ka Ga Distes
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी

    शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हां येतो कंटाळा
    रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ?

    वारा-वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
    कसा गडे तू तोल राखसी, पुढती पुढती पाय टाकिसी

    काठी देखिल नसते हाती, थोडी नाही विश्रांती
    चढसी कैसी, कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरसी

    वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई
    म्हणुनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems