गदिमा नवनित
  • हस्ति सर्व संपदा,मस्तकात शारदा
    असे असून दिनसा,झुरसी काय व्यर्थ तू,माणसा समर्थ तू!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते
  • Chandra Anakhi Priti Yanche
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    चंद्र पाहता स‍इ प्रीतीची तरुण मना का येते ?
    चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते ?

    अग कलावती तू, तुला असावी अचूक तयाची जाण ग
    अन्‌ प्रीतनगरचा राजा मन्मथ, चंद्र तयाचा प्रधान ग !
    अग प्रीतनगरची प्रजा तयाच्या मुजर्‍यासाठी येते
    अन्‌ प्रधान साक्षी ठेवून राणी आण प्रीतीची घेते

    तोंडावरती जडे काळीमा, झिजते ज्याची कला कला
    तो मदनाचा मंत्री कैसा समजुनी सांगा तुम्ही मला ?
    गुरुपत्नीशी पाप करी हा, शाप बाधला याते
    चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते ?

    अग चंद्र उगवता समुद्र उसळे, चढती डोंगरलाटा
    अन्‌ तो देखावा प्रीतरसाचा शाहीर म्हणती मोठा
    अग नभ-धरणीचे अंतर त्यांच्या प्रीतिने तुटते
    अन्‌ चंद्र आणखी प्रीती यांचे तूच ठरव गे नाते !

    लाटा उठती सागरात ज्या, त्या तर त्याच्या लेकी
    चंद्र-लहरिंची प्रीत जोडिती त्यांची फिरली डोकी !
    सख्खि बहिण अन्‌ सख्ख्या भावाची प्रीत कधी का होते ?
    चंद्र आणखी प्रीती यांचे काय असावे नाते ?

    अग चंद्र कसा ग होईल भाऊ उगाच सागरलाटांचा ?
    अन्‌ आधारासी दाव पुरावा, नको धिटावा ओठांचा !

    देवदानवी समुद्रमंथन पुराणांतरी केले ना !
    मंथनात त्या रत्‍न चंद्रमा उसळुन वरती आले ना !
    जन्म पावला सागरपोटी तो तर त्याचा बेटा
    त्याच सागरी जन्मतात ना निळ्या उसळत्या लाटा !

    अहो बहिण-भाऊ याहून कुठले चंद्र-लहरिंचे नाते ?
    चंद्र पाहता स‍इ प्रीतीची तरुण मना का येते ?


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems