गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • चांद किरणांनो जा जा
 • chand Kirananno Ja Ja
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा
  फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा

  हळू चढा खिडकीत पहा डोकावुनी आत
  मूर्त माऊलीची माझ्या न्याहळा जरा
  जा जा जा रे माझ्या माहेरा !

  पाडसाची चिंता माथी करी विरक्‍तीची पोथी
  डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे

  झरा
  जा जा जा रे माझ्या माहेरा !

  टांगलेली छायाचित्र देवासारखे पवित्र
  स्वर्गवासी माझे बाबा रक्षिती घरा
  जा जा जा रे माझ्या माहेरा !

  पलीकडे खाटेवरी भर मध्यान्हीच्या पारी
  दिव्यातली भाऊराया वाची अक्षरा
  जा जा जा रे माझ्या माहेरा !


गदिमा गौरव | Special Quotes
 • प्रा.रा.ग.जाधव
  माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems