गदिमा नवनित
  • दैव जाणिले कुणी,लवांकुशाचा हलवी पाळणा
    वनी वाल्मिकी मुनी,दैव जाणिले कुणी?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • चांद मोहरे चांदणे झरे
  • chand Mohare Chandane Zare
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    चांद मोहरे, चांदणे झरे
    झोपेतच गाली असा हसशी का बरे ?

    गगनातील नील परी, उतरुनीया भूमीवरी
    उचलुनीया नेती तुला उंच काय रे ?

    उंच उंच गगनी तुला, काय दिसे सांग मुला
    दिसते का हळू विमान एक संचरे

    बसून आत कोण हसे, कुशल कुणी तरूण पुसे
    खचितच तेच प्राणनाथ सांगू काय रे

    जाग जरा नीज सोड, पापा दे मजसी गोड
    फिरुनी जाय लंघुनीया सात अंबरे


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems