गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
जग हे बंदिशाला
Jag He Bandishala
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
जग हे बंदिशाला
कुणी न येथे भलाचांगला, जो तो पथ चुकलेला !
ज्याची त्याला प्यार कोठडी
कोठडीतले सखे सौंगडी
हातकडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला !
जो तो अपुल्या जागी जखडे
नजर न धावे तटापलिकडे
उंबरातले किडेमकोडे,
उंबरि करिती लीला !
कुणा न माहीत सजा किती ते
कोठुन आलो ते नच स्मरते
सुटकेलागी मन घाबरते, जो आला तो रमला !
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.