गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
Janmach Ha Tujsathi Priya Re
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
जन्मच हा तुजसाठी प्रिया रे
नव्हत्या माहीत मज वेडीला जन्मांतरीच्या गाठी
मनात आला विनोद केवळ
बोलुन गेले काही अवखळ
ओठी होती अल्लड बोली, आपुलकी पोटी
चुरगळली मी हिरवी पाने
सहजपणाने, अज्ञानाने
आज उमटली लालस मेंदी तळहाती, बोटी
परिहासाची विसर बोलणी
आठव होते काय लोचनी
परिचय झाला प्रणयासाठी, परिणय मग शेवटी
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.