गदिमा नवनित
  • अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • जय जवान जय किसान
  • Jai Jawan Jai Kisan
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
    जय जवान, जय किसान !
    जय जवान, जय किसान, जय जय !

    अखिल देश पाठीशी 'जवान' व्हा रणी चला
    किसान होऊनी कसा भूमी सस्य श्यामला
    यौवनास योग्य रे शौर्य आणि स्वाभिमान
    जय जवान, जय किसान

    !

    शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
    आपल्या श्रमे करू प्रसन्न देवी अन्नदा
    उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
    जय जवान, जय किसान !

    अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
    भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
    स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
    जय जवान, जय किसान !


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems