गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • जा मुलि शकुंतले सासरी
  • Ja Muli Shakuntale Sasari
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    जा मुलि शकुंतले, सासरी
    आवरी डोळ्यांमधल्या सरी !

    वडील मंडळी असतिल कोणी
    वागच त्यांच्या अर्ध्या वचनी
    सवतीलागी मानुनी बहिणी राहि सदा हासरी !

    पतिसेवा हे ब्रीद आपुले
    देवाहुन ती थोर पाउले
    रागावून ते जरी बोलले, बोलु नको त्यावरी !



    दोन्ही कुळांचे नाव वाढवी
    पतिव्रतेची पदवी मिळवी
    संसारी तुज वाण नसावी लक्ष्मी तू साजरी !


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems