गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • जाण आहे आपणांसी
  • Jaan Aahe Aapnasi
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    जाण आहे आपणांसी मी कशाला सांगणे
    कठिण झाले प्राणनाथा एकट्याने राहणे

    दिवस जातो सहज सरुनी, रात्र बसते रोवुनी
    पेटती हट्टास डोळे नाव तुमचे घेउनी
    चहू दिशांना एक दिसते रूप उमदे देखणे

    नेटका संसार माझा नांदते मी गोकुळी
    दु:ख आहे एक

    हे की राव नाही राउळी
    फुलून सुकती भाव माझे ते कुणाला वाहणे

    थेट तुमची सान मूर्ती बाळ भवती खेळतो
    पाहुनी त्या बाललीला आंसू गाली वाळतो
    बिंब दिसता संपते का चातकाचे मागणे