गदिमा नवनित
  • दगडाच्या देवा दह्याच्या घागरी,अस्पृश्याच्या घरी पाणी नाही.
    पाळीव पोपट गोड फळे त्याला आणि गरिबांना कदांन्न का?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • जो जो जो बाळा जो जो जो
  • Jo Jo Jo Bala JO Jo Jo
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    जो जो जो बाळा जो जो जो
    कुलदीपक तू, जगात सार्‍या नाव तुझे गाजो

    तुझ्या पाळण्या जवळी, भवती
    उभ्या जागत्या सदैव जिवती
    तुला पाहता शुक्‍लपक्षिची चंद्रकला लाजो

    न्हाऊ घालता माझा तान्हा
    धटी उमटतील गंगा-यमुना
    देवाघरची धेनू येऊन दूध तुला

    पाजो

    रांगशील मग गुडघ्यावरती
    रूप रेशमी धरेल धरती
    मांडीवरती वडीलजनांच्या मूर्ति तुझी साजो


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems