गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • झटकून टाक जिवा
 • Zatakun Taak Jiva
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  झटकून टाक जिवा दुबळेपणा मनाचा
  फुलला पहा सभोती आनंद जीवनाचा

  होईल ताप काही मध्यान्हिच्या उन्हाचा
  अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा
  आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा

  पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे
  आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे
  हसुनी करी

  परि ते वर्षाव सौरभाचा

  का कालचा उद्याला देसी उगा हवाला
  द्यावाच वाटतो ना मग जीव दे जिवाला
  अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा