गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
Mazya Gharatli Tu Gruhini Sakhi Sachiv
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
ही एक आस होती हृदयात एकमेव
डोळ्यापुढे दिसे रे मज चित्र ते सजीव
कोलाहली जगाच्या घरकूल आपुले गे
सोलीव शांततेचे मंदिर सानुले गे
मी तेथली पुजारी, तू
पूजनीय देव
गीतासवे तुझ्या गे गेही प्रभात व्हावी
खाद्या रुचि सुधेची हाते तुझ्याच यावी
वाहीन देह देवा, वाहीन जीवभाव
दिन सोनियात न्हावा, रजतात रातराणी
आनंद तोच यावा लेवून बाललेणी
साकार ये समोरी स्वप्नात हीच शीव
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.