गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • तुझी रे उलटी सारी तर्‍हा
 • Tuzi Re Ulati Sari Tarha
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  तुझी रे उलटी सारी तर्‍हा
  सौंदर्याची दौलत टाकुन जासी भलत्या घरा

  राजमंदिरी असंख्य नारी
  रूपवती त्या अतुल सुंदरी
  तुडवुन त्यांची नाजुक सुमने जासी परदारा

  शोभे का हे तुला माधवा
  गालबोट हे तुझिया नावा
  सोडुन दे ती कुब्जा काळी सोडुन

  दे श्रीधरा

  हात जोडिते पदर पसरिते
  तुजविण जीवन उदास गमते
  तुझ्या पदाविण दिसे भुकेला सोन्याचा उंबरा