तुझ्या कांतिसम रक्तपताका
TUzya Kantisam Raktapataka
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
तुझ्या कांतिसम रक्तपताका पूर्वदिशी फडकती
अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती
सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषकध्वजा
सुभद सुमंगल सर्वाआधी तुझी पाद्यपूजा
छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती
आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे
पांचमण्याच्या किरणांसम ही हिरवी दुर्वादळे
उभ्या
ठाकल्या चवदा विद्या घेउनिया आरती
शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा
तिन्ही जगांचा तुच नियंता, विश्वासी आसरा
तुझ्या दर्शना अधीर देवा हर, ब्रम्हा, श्रीपती