गदिमा नवनित
  • मागता गे न मिळे,टाळल्याने ना टळे,
    जीवमात्रा सोडिना हे, जन्म-मृत्यूचे जुळे.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • तुझ्या मनी तेच माझ्या मनी
  • Tuzya Mani Tech Mazya Mani
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    ऐन वयात आलेली मी रे नाजूक छबी, आले बाजारा एकली
    सांगलीच्या पेठंत बाजाराच्या वाटंत काय होतं घाटंत तुझ्या मनी ?
    तुझ्या मनी तेच माझ्या मनी

    मोठी कलदार नाण्यांची ओतली
    नथ मोत्यांची विकत घेतली
    गोर्‍या नाकात झोकात घातली
    आपुल्याच तोर्‍यात चालता मी बार्‍यात

    काय आलं होर्‍यात तुझ्या मनी ?
    तुझ्या मनी तेच माझ्या मनी
    सार्‍या चिंचांचा सौदा करून
    हारा माथी मी घेतला भरून
    घरी निघाले लगबग करून
    संग संग चालायचं काही नाही बोलायचं हेतू होता हमखास तुझ्या मनी
    तुझ्या मनी तेच माझ्या मनी

    आली बोरंची पाणंद थोडी
    दोन्ही बाजूनी दाटली झाडी
    तुझ्या डोळ्यात चमचम बेडी
    चालताना मागून हात तुझा लागून वीज गेली जागून माझ्या मनी
    तुझ्या मनी तेच माझ्या मनी

    काही ओळख पाळख नसून
    मी रे उगाच हसून
    थोडं लटकं लटकं रुसुन
    पुढं पुढं चालायचं काही नाही बोलायचं हेतू होता हमखास माझ्या मनी
    तुझ्या मनी तेच माझ्या मनी


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems