गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • तुम्ही माझे बाजीराव
  • Tumhi Maze Bajirao
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    माझ्यासाठी दिली राहुटी, इतरांना मज्जाव
    तुम्ही माझे बाजीराव

    मी मस्तानी, हिंदुस्तानी, बुंदेली पेहेराव
    झिरझिरवाणी, निळी ओढणी, वाळ्याचा शिडकाव

    तुम्ही मराठे, नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभाव
    शूर शिपाई, तुमची द्वाही, चारी मुलखी नाव

    उभी अंगलट, तांबुस फिक्कट, नयनीं दाटला

    भाव
    बोलांवाचुन, ख्यातीवाचुन, अर्जी आविर्भाव

    काल दुपारी, भरदरबारी, उरी लागला घाव
    मी पण चळले, तुम्हा भाळले, आता नाही निभाव

    दिठीदिठीचा, नजरमिठीचा, हो‍ऊ द्याच सराव
    या पायांसी, मज दाशीसी, मिळेल का कधी वाव ?


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems