गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
दूर कुठे राउळात
Door Kuthe Raulat
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया !
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या !
असह्य एकलेपणा, आस आसवीं मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमांस पूर या !
दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी
दृष्टिभेटही
नसे, काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया !
सलत सूर सनईचा वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे मूक भाव लाजरा
फुलांत गंध कोंदला वाट ना उरे तया !
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.