गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • दैव जाणिले कुणी
 • Daiva Janile Kuni
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  दैव जाणिले कुणी ? हो, दैव जाणिले कुणी ?
  लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मीकी मुनी

  मृग सोन्याचा जगी असंभव
  तरीहि तयाला भुलले राघव
  श्रीरामाला चकवून गेल्या शक्‍ती मायाविनी

  आपद मस्तक विशुद्ध सीता
  पतिव्रता ती मूर्त देवता
  पतितपावने तिला त्यागिली,

  तशात ती गर्भिणी

  राजपुत्र जे नृपती उद्याचे
  शिशुपण त्यांचे दीनपणाचे
  रत्‍नकंदुका जागी हाती मातीची खेळणी