गदिमा नवनित
  • या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
    पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • का असा गेलास तू
  • Ka Asa Gelas Tu
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    का असा गेलास तू ? ना बोलता ना सांगता
    दो दिसांच्या संगतीची हीच का रे सांगता ?

    भावमाला लोपल्या ओठिंच्या ओठीच का ?
    फुलविली तू लाज गाली सुकविण्यासाठीच का ?
    पुसुन गेल्या रंग-रेखा चित्र अपुरे रंगता !

    दूर व्हाया जवळ आली

    काय वेडी पाखरे ?
    ये पुन्हा ये राजहंसा, पंखि जिवा झाक रे !
    हाक मारू मी कशी रे, गूज फुटते बोलता !

    ठाऊका ना ठाव कोठे, मार्ग नाही माहिती
    शोध घ्याया अंतरीचे नेत्र माझे धावती
    ये उदारा, राजसा रे, आसरा दे मागता !


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems