गदिमा नवनित
  • एक धागा सुखाचा,शंभर धागे दु:खाचे
    जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • धुंद मधुमती रात रे
  • Dhund Madhumati Raat re
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    धुंद मधुमती रात रे
    तनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे

    जललहरी या धीट धावती
    हरित तटांचे ओठ चुंबिती
    येइ प्रियकरा, येइ मंदिरा, अलि रमले कमलांत रे, नाथ रे

    ये रे ये का मग दूर उभा ? ही घटिकाहि निसटुनी

    जायची
    फुलतील लाखो तारा परि ही रात कधि कधि ना यायची
    चषक सुधेचा ओठी लावुनि कटिभंवती धरि हात रे, नाथ रे


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems