गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • नवल वर्तले गे माये
 • Naval Vartale Ge Maye
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
  मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु

  हास्यचि विलेसे ओठी, अद्भुतची झाले गोठी
  रातिचिये स्वप्‍नी आला कोवळा दिनेशु

  पहाटली आशा नगरी, डुले पताका गोपुरी
  निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु


गदिमा गौरव | Special Quotes
 • लेखक पु.भा.भावे:
  वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems