गदिमा नवनित
  • दैवजात दु:खें भरतां दोष ना कुणाचा
    पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • थकले रे नंदलाला
  • Thakale Re Nandalala
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    नाचनाचुनी अति मी दमले
    थकले रे नंदलाला !

    निलाजरेपण कटिस नेसले, निसुगपणाचा शेला
    आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला
    उपभोगांच्या शतकमलांची कंठि घातली माला

    विषयवासना वाजे वीणा, अतृप्‍ती दे ताला
    अनय अनीती नूपुर पायी, कुसंगती करताला
    लोभ प्रलोभन नाणी

    फेकी मजवर आला-गेला

    स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला
    तालाचा मज तोल कळेना, सादहि गोठुन गेला
    अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला