गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
Box-C-30
कशी रुसून गेली राणी
Kashi Rusun Geli Rani
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
पहिले भांडण केले कोणी ?
सांग रे राजा, कशी रुसून गेली राणी !
अडखळला का पाय जरा
वळता, गळला का गजरा ?
लटका होता राग मुखावर डोळ्यांत लटके पाणी !
मान वेळता खेळ कळे
दंवात फुलले दोन कळे
थरथरणारे
ओठ जहाले क्षणांत हसल्यावाणी !
कलह प्रीतिचा गोडीचा
विलास जमल्या जोडीचा
विरह नकोसा, तरिही सुंदर, जीव गुंतता दोन्ही !
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.