गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
 •  
 • Box-C-30
 • पाहिली काय वेलींनो
 • Pahili Kay Velinno
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  पाहिली काय वेलींनो तन्वंगी माझी सीता
  देखिली काय वृक्षांनो शालीन धरेची दुहिता

  हे ताल तरुंनो तुमची गगनाला शीर्षे भिडली
  आकाशपथी ती तुमच्या दृष्टीस कशी ना पडली
  उत्तुंग गिरींनो कोठे टेकिला सतीने माथा

  मेघांनो तुम्हाही का वैदेही दिसली नाही
  जाणीव पुण्यस्पर्षाची

  पवना तुज झाली नाही
  बोलली नाही का काही ती व्योमपथाने जाता

  निष्पाप आसवे कैसी झेलली फुलांनो नाही
  हे विहंगमांनो सांगा तिजविषयी वार्ता काही
  एकटा जटायु का रे साक्षीस त्रिभुवनी होता


गदिमा गौरव | Special Quotes
 • लेखक पु.भा.भावे:
  वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems